You are currently viewing मायाजाल

मायाजाल

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मायाजाल*

~~~~~~~

 

आज सारेच व्यर्थ वाटते

जगणेही नकोसे भासते

आठविता आठव आता

खरे होते की खोटे वाटते

 

सत्य होते सारे आभासी

असे लोचनांना जाणवते

प्रेमास्था लळा जिव्हाळा

लोपलासे जीवास वाटते

 

स्पंदनात आज साशंकता

काळजात ही धस्स्स होते

प्रश्न एक आज भेडसावतो

कोण आपुले न इथे कळते

 

सारा केवळ हा मायाजाल

अंती आत्म अंतर्मुख होते

कोण तो कृपाळु अनामिक

निष्पाप मन शोध घेत रहाते

~~~~~~~~~~~~~~

*©️वि.ग.सातपुते. (भावकवी)*

प्रतिक्रिया व्यक्त करा