You are currently viewing तू पानाफुलांचा राजा…
Oplus_16908288

तू पानाफुलांचा राजा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

तू पानाफुलांचा राजा…

 

तू पानाफुलांचा राजा

तू सदैव ताजा ताजा

बा श्रावणा तुला रे नमस्कार माझा..

 

तू उधळीत येतो रंग

मस्तीत असा तू दंग

फुलवित बांध बांध मज भासतसे श्रीरंग..

 

तू कलाकुसर नक्षी

तू सुंदर रे गुलबक्षी

तू मारतो भरारी अवकाशी बनून पक्षी..

 

तू झुलाच झुलवित येतो

वेलीत फुले फुलवितो

मन पावन पावन रे तू घंटानाद घुमवितो..

 

राऊळात भक्तिभाव

किती टाळ वाजतात

श्रावणा सारे भक्त आनंदे डोलतात..

 

तू हिरवाई अनमोल

सण वाजविती ढोल

रुजलाय श्रावणा तू रे मनोमनी खोल…

 

परिसीमा सौंदर्याची

श्रावणा तुझे नाव

तू ऊनपावसाचा खेळतो खेळ राव…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा