You are currently viewing बंधुभाव

बंधुभाव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य तथा अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे लेखक कवी श्री.माधव सातपुते (विगसा) लिखित अप्रतिम काव्यरचना*

*बंधुभाव*
***********
हौस मला जगुनी जगविण्याची
न मी कधीच स्वतःसाठी जगलो
माणसात रहाण्याचे वेड मजला
ते मैत्र मात्र नित्य जपत राहिलो

एकटे पणाची मला सवय नाही
मी सर्वा आपुलेसे करीत राहिलो
न कधी कुणाचा तिरस्कार केला
जे भेटले भगवंत मानित राहिलो

न केली कुणाची कुचेष्टा मस्करी
न राग द्वेष कधी करीत राहिलो
जग सारेच आपले हाच बंधुभाव
मी मनांत सदा रुजवित राहिलो

क्षण जगलेला आपुलाच मानला
नाही कोणत्या हव्यासात गुंतलो
दातृत्वी संस्कारांच्या गंगाजळी
श्रद्धेने *अर्ध्य्य* मी देत राहिलो
*************************
*रचना क्र.३६०/ २९ /१२ /२०२२*
*©️वि.ग.सातपुते. ( भावकवी. )*
*📞( 9766544908*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =