You are currently viewing शायरी

शायरी

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य ज्येष्ठ कवी, गझलाकार श्री अरविंदजी ढवळीकर यांची रचना

तू भेटलीस मज जेंव्हा बघ हवा बदलली होती
हातात हात तू देता मग वाट उजळली होती

निःशब्द नजरही खाली मी विचारता तुज कांही
परी वाऱ्याने बटा उधळता तू दिसें लाजली होती

तू बोललीस ना कांही जे कवितेत उतरले होते
त्या शब्दांच्या किरणांनी तुज साद घातली होती

कोजागिरी सुखाची नशिबात कुणाच्या असते
चन्द्रासही वाटून हेवा बघ ती रात्र लांबली होती

जन्म या मिठीतच जावो मरणही पौर्णिमा भासो
कधी म्हणो आठवून सारे शायरी चांगली होती

अरविंद

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + 18 =