You are currently viewing सावंतवाडी येथे वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु

सावंतवाडी येथे वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु

सावंतवाडी येथे वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु

सावंतवाडी :

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच माहिती व जनसंपर्क क्षेत्रासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नोकरी वा शिक्षण पूर्ण करता करता हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या प्रमाणपत्र शिक्षणक्रम उत्तीर्ण , मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी शिक्षणक्रम उत्तीर्ण, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी किंवा इतर राज्यातील समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, १९७५ पूर्वीची माध्यमिक  शालान्त परीक्षा ११ वी उत्तीर्ण  किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर सलग किमान दोन वर्षांचा कोणताही शासनमान्य अभ्यासक्रम उत्तीर्ण असणाऱ्या व्यक्ती या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत घेता येईल. ही अंतिम मुदत आहे. विद्यापीठात ड्युअल डिग्रीची सुविधा आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी केंद्र संयोजक राजेश मोंडकर ९४२३३०१७३१ , मंगल नाईक-जोशी ९४०५८३१६४६यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रप्रमुख रमेश बोन्द्रे यांनी केले आहे.


राजेश मोंडकर
केंद्र संजोयक
वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रम
श्रीराम वाचन मंदिर अभ्यासकेंद्र
सावंतवाडी
९४२३३०१७३१
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा