कुर्ली नवनगर देवींची विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न
दहा दिवसांच्या सेवेनंतर देवीला भावपूर्ण निरोप; अजित नाडकर्णी यांची मंडळाच्या कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप
फोंडाघाट :
कुर्ली नवनगर येथील श्री देवींची दहा दिवसांच्या सेवेनंतर आज विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली. गेल्या दहा दिवसांत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे संपूर्ण उत्सव आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या काळात फोंडाघाटवासीयांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करताना अजित नाडकर्णी यांनी, इतकी वर्षे झाली तरी फोंडाघाटवासीयांनी आम्हाला नेहमीच सावरून घेतले आणि सहकार्य केले, अशी भावना व्यक्त केली. श्री साई मंदिरात भाविकांसाठी नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अजित नाडकर्णी यांनीही देवीचे दर्शन घेतले.
या उत्सवाला मंत्री नितेश राणे यांनीही भेट देऊन मंडळाला सदिच्छा दिल्या. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांच्या अविरत मेहनतीतून दहा दिवसांचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे अजित नाडकर्णी यांनी नमूद केले.
“ आमच्याकडून कोणतीही मदत हवी असेल, तर मी आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे,” अशी ग्वाही अजित नाडकर्णी यांनी यावेळी दिली. त्यांच्या या आश्वासनामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळाले.
