You are currently viewing जिल्ह्यात 10 ऑगस्ट रोजी रोजगार व अप्रेंटिसशिप मेळावा

जिल्ह्यात 10 ऑगस्ट रोजी रोजगार व अप्रेंटिसशिप मेळावा

जिल्ह्यात 10 ऑगस्ट रोजी रोजगार व अप्रेंटिसशिप मेळावा

 सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार व अप्रेंटिसशिप मेळावा (तांत्रिक पदांकरिता) सोमवार, दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सावंतवाडी येथे सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात 15 हून अधिक नामांकित उद्योग सहभागी होणार असून 300 पेक्षा अधिक रोजगार व अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विविध उद्योग व आस्थापनांमार्फत तांत्रिक पदांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.

DLM, MMV, Wireman, Electrician, Fitter, Turner, Welder, Auto Electrician, Carpenter, COPA, ICTSM, CHNM, Tailoring, Dress Making, RAC तसेच इतर संबंधित तांत्रिक ट्रेडमधील उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. ITI, डिप्लोमा व अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेले तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थीही सहभागी होऊ शकतात.

निवड झालेल्या उमेदवारांना सिंधुदुर्ग, मुंबई, गोवा तसेच इतर औद्योगिक क्षेत्रांमध्ये रोजगार व अप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांनी मेळाव्यास येताना अद्ययावत Resume, शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्रे, आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र तसेच पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावे.

जिल्ह्यातील ITI, डिप्लोमा व अभियांत्रिकी उत्तीर्ण तसेच अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा