*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी लेखक संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कितीदा पाहिलं तुला*
कितीदा पाहिलं तुला
रात्रभर जागलेलं,
पण कधीच पाहिलं नाही
असं निवांत झोपलेलं.
आयुष्यभर तुझ्या नशिबी
राब, राब, राबणंच असतं;
उंबरठ्याच्या बाहेर कधी
जगणं तुझं नसतं.
घडीभर थांबून तू कधी
सुखाचा घास घेत नाहीस;
चार घास दुसऱ्यांना देताना
तुझ्या वाट्याला काहीच येत नाही.
वेदना पदराला बांधून
तू फक्त हसतच राहायचं,
दुसऱ्यांच्या सुखामध्ये
स्वतःचं सुख पाहायचं.
घरपण देता देता
तू तुलाच विसरून जातेस;
तुझ्याच जखमांवर तू
कितीदा पांघरूण घालतेस.
तुला असं गाढ झोपलेलं पाहून
मनात हुंदका दाटून येई;
डोळे भरून बघताना
कळेना, कुठली गाऊ अंगाई.
तुझे त्याग, समर्पण, कष्ट
पाहून घेतो जरा वेळ;
तुझ्याच सोबत खेळेन मी
प्रत्येक जन्मी भातुकलीचा खेळ.
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९५७९११३५४७
९४२२८९२६१८
