You are currently viewing नारायण राणे लोकसभेला निवडणूक लढवीत असतील तर नक्कीच पक्षाची युती म्हणून त्यांच्या प्रचार करून त्यांना निवडून आणू

नारायण राणे लोकसभेला निवडणूक लढवीत असतील तर नक्कीच पक्षाची युती म्हणून त्यांच्या प्रचार करून त्यांना निवडून आणू

भाजप शिंदे सरकार एकत्र आले त्यावेळेस वाद संपला! राणे साहेबांचा मी आदरच करतो – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

 

सिंधुदुर्गनगरी :

 

माझा वाद हा तात्विक होता तो नारायण राणें साहेबांशी कधीही नव्हता! नारायण राणेंशी वाद कधीच संपलेला आहे. भाजप व शिंदे सरकार एकत्र आले त्यावेळेस आपला वाद संपला! वाद संपल्यानंतर मी कधीच त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं नाही. राणे साहेबांबद्दल बोलताना मी नेहमी आदराने बोललेलो आहे. पूर्वी हा संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जायचा, तेवढे वाद पक्षांच्या कार्यकर्त्यामधून होते. हे कुठेतरी संपले आणि जिल्हा आता शांत झालेला आहे. नारायण राणे जर लोकसभेला भाजपकडून उभे राहिले तर त्यांचाच प्रचार करनार! अशी प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या पत्रकारांशी बोलताना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व्यक्त केली.

राणे साहेबांकडे महत्त्वाचं खात आहे. या जिल्ह्यात ते चांगलं काम करत आहेत. आपला त्यांच्याशी नेहमी संवाद असतो विकास कामाबद्दल चर्चा असते. या जिल्ह्यात त्यांनी आणखी चांगलं काम करता यावं म्हणून आमच्या व आमच्या पक्षाचं त्यांच्या पाठीशी नेहमी सहकार्यच राहणार. राजकीय परिस्थितीत तात्विक वाद होते. मात्र राज्यात भाजप व शिंदे सरकार एकत्र आलं त्याचवेळी ते वाद संपले, असेही नामदार दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले. जर नारायण राणे लोकसभेला उभे राहिले तर त्यांचा प्रचार करणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले भाजपचे उमेदवार म्हणून ते लोकसभेला निवडणूक लढवीत असतील तर नक्कीच पक्षाची युती म्हणून त्यांच्या प्रचार करू त्यांना निवडून आणू व पुढच्या कोणत्याही निवडणुकीत युतीचा कोणताही उमेदवार असला तरी युती म्हणून प्रचार करून सोबत राहणार असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + nineteen =