You are currently viewing दक्षिण कोरियात देवगडच्या धन्वी वळंजूची दुहेरी रौप्यपदकांची चमक

दक्षिण कोरियात देवगडच्या धन्वी वळंजूची दुहेरी रौप्यपदकांची चमक

दक्षिण कोरियात देवगडच्या धन्वी वळंजूची दुहेरी रौप्यपदकांची चमक

जागतिक तायक्वान्डो कल्चर एक्स्पो २०२६ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व; क्योरुगी आणि पुमसे प्रकारात दोन रौप्यपदकांची कमाई

देवगड : प्रतिनिधी

दक्षिण कोरिया येथे संपन्न झालेल्या १९ व्या जागतिक तायक्वान्डो कल्चर एक्स्पो २०२६ स्पर्धेत देवगडची कन्या धन्वी नितीन वळंजू हिने भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली. क्योरुगी आणि पुमसे या दोन प्रकारांत प्रत्येकी एक अशी दोन रौप्यपदके जिंकून तिने भारतासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले.
धन्वी ही सध्या मुंबई सेंट्रल येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून तिने यापूर्वीही विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने एक सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावले होते. तसेच जून २०२६ मध्ये पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वान्डो स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.
या सातत्यपूर्ण यशाच्या जोरावरच धन्वीची दक्षिण कोरियातील जागतिक स्पर्धेसाठी निवड झाली. स्पर्धेतील तिच्या दमदार कामगिरीमुळे भारताला दोन रौप्यपदकांची भर पडली.
धन्वीला प्रशिक्षक रोहिदास शिर्के, नवीन दवे आणि ग्रँडमास्टर नीलेश जालनावाला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून देवगडसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा