You are currently viewing कुटुंबियांसमवेत आमदार दीपक केसरकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कुटुंबियांसमवेत आमदार दीपक केसरकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कुटुंबियांसमवेत आमदार दीपक केसरकरांचा वाढदिवस उत्साहात साजरा

मुंबईतील निवासस्थानी केक कापून औक्षण; मतदारसंघात विविध सामाजिक व जनहिताचे उपक्रम

सावंतवाडी

जनतेच्या मनात विकासाभिमुख नेतृत्वाची ठाम ओळख निर्माण करणारे माजी मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबियांच्या प्रेमळ सहवासात आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कुटुंबियांनी केक कापून त्यांचे औक्षण करत निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, नातू अर्जून तसेच कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते. आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळ्याने भरलेल्या या कौटुंबिक क्षणांनी वाढदिवसाचा आनंद अधिकच द्विगुणित केला.
दरम्यान, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यात आले. रक्तदान शिबिरे, सत्कार समारंभ, मोफत आरोग्य शिबिरे तसेच विविध लोकोपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्याविषयीचा स्नेह, आदर आणि शुभेच्छा व्यक्त केल्या.
जनसेवा, विकास आणि साधेपणाची परंपरा जपणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबासह संपूर्ण मतदारसंघात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा