You are currently viewing नदीला पूर आलेला

नदीला पूर आलेला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नदीला पूर आलेला*

 

नदीला पूर

दुथडी भरून

तोडून मर्यादा

पसरली वाहून…

जोराचा प्रवाह

दगड माती

वाहून नेली

काठावरील शेती..‌

पाणीच पाणी

गढूळलेलं

शेतशिवार

धुवून नेलं…

कोसळले वृक्ष

भिंतीही पडल्या

पूल खचले

सडकाही गेल्या.‌‌.‌

वाहनं वाहिली

बोटी बुडाल्या

पुराचा कहर

डोळ्यात माजला‌..

बघता बघता

शेळ्या गायी गुरे

गिळले पाण्याने

काही ना उरे..

चिल्ले पिल्ले

कुठे हरवले

मायबापांचे

काळीज लकाकले…

नको असा गं

करू विध्वंस

तुझ्यावर जीवन

शेतीची आस..‌

शांत हो बये

आमचेही चुकते

पर्यावरणाला

हानी पोचते…

नको कोपू अशी

आम्ही तुझी लेकरे

हात जोडून

विनंती ही बरे..‌.!!

 

अरुणा दुद्दलवार✍️💦

प्रतिक्रिया व्यक्त करा