You are currently viewing कान्हा

कान्हा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री प्रतिभा हरणखेडकर लिखित अप्रतिम गौळण काव्य रचना*

*कान्हा*

जवळ दिसे कधी दूर गवळण झाली संभ्रमित
गुपचूप बाई आला कान्हा हा मागून गं अवचित||धृ||

नटखट कन्हैया नको ना नको काढूस बाई खोडी
काय हवे तुज सांग लाविशी का तू मज लाडीगोडी
काहीतरी असेलच तुजला पाहिजे की रे खचित
गुपचूप बाई आला कान्हा हा मागून गं अवचित ||१||

भल्या पहाटे घाईमध्ये चालले यमुनेच्या गं तीरी
पाणी भरण्या जाई घेऊनी हाती नक्षीदार घागरी
घेता घागर भरून डोईवर घडलेना आक्रित
गुपचूप बाई आला कान्हा हा मागून गं अवचित ||२||

पाणी भरल्या घागरी कान्हा नको रे मारुस खडे
फुटल्या जर तर घरला सांगू काय कारण गडे
काय घडेल मग तिथे रामायण नाही रे माहित
गुपचुप बाई आला कान्हा हा मागून गं अवचित

तुच आम्हाला दिले आहेस हरी रे आध्यात्माचे धडे
ज्ञानामृत भरलेले घडे मग सांग का फोडी गडे
मधेच झाली खस खस झाडाच्या फांद्या दूर सारित
गुपचूप आला बाई कान्हा हा मागून गं अवचित.||

*प्रतिभा हरणखेडकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 18 =