शिखर यूथ फाउंडेशनच्या पुढाकारातून १,३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट व रेनकोटचे वाटप
पालघर (गुरुदत्त वाकदेकर) :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने शिखर यूथ फाउंडेशनच्या वतीने रविवार, १२ जुलै २०२६ रोजी पालघर जिल्ह्यातील २५ जिल्हा परिषद शाळांमधील १,३५० गरजू व वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट आणि रेनकोटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा, सोमटे येथे झाली. त्यानंतर नानिवली आश्रम शाळेत दुसऱ्या टप्प्यात, तसेच नागझरी जिल्हा परिषद शाळेत वितरण कार्यक्रम पार पडला. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना एकूण १,३५० शैक्षणिक किट आणि १,३५० रेनकोट वितरित करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक वह्या, स्टेशनरी साहित्य आणि पावसाळ्यात सुरक्षितपणे शाळेत ये-जा करण्यासाठी रेनकोट मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
शैक्षणिक साहित्याचे वितरण करताना विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले. आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देत मोठी स्वप्ने पाहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांनी व्यक्त केलेले समाधान हे या उपक्रमाचे खरे यश ठरले.
हा उपक्रम समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक, हितचिंतक आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पोवई यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे यशस्वीरीत्या पार पडला. त्यांच्या योगदानामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाले. त्यामुळे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला महत्त्वपूर्ण आधार मिळाला.
शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि समाजकल्याण या क्षेत्रांत सातत्याने कार्यरत असलेल्या शिखर यूथ फाउंडेशनने या उपक्रमातून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. भविष्यातही वंचित आणि गरजू घटकांसाठी अशाच लोकहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी संस्थेचे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
👉🏼*गाडी घ्यायची आहे पण कर्ज करिता इनकम प्रूफ नाही*
मग विचार कसला करताय
खास आपल्या करिता आम्ही घेऊन आलो
🌈*नो इनकम प्रूफ लोन स्कीम*
देशाची सर्वात जास्त विकली जाणारी कार टाटा पंच आणि सेफस्ट स्मॉल कार टाटा टियागो करिता
✅*डाउन पेमेंट केवळ ₹.९४,९९९/-*
आजच आपल्या जवळ चे आमचे शोरूम ला भेट द्या अथवा आम्हाला कॉल करा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपूर्ण स्वदेशी अभियान*
*भारतीयांनी भारतीयांकरीता बनवलेली कार*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
खालील लिंक वर केवळ क्लिक करा आणि आपला इंटरेस्ट रजिस्टर करा
https://t.ly/pdI_1
आजच भेट दया अथवा कॅाल करा..!!
*एस.पी.ॲाटोहब*
रत्नागिरी । चिपळुण । कणकवली
*7377959595*
_Credit approval at the sole discretion of bank_
नवनवीन अपडेट्स करीता फॉलो करा
*https://www.instagram.com/tata_motors_spautohub_rtn?igsh=YmRyMW12amRlaGpw*
