You are currently viewing अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी सावंतवाडीत काँग्रेसचे भजन आंदोलन

अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी सावंतवाडीत काँग्रेसचे भजन आंदोलन

अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी सावंतवाडीत काँग्रेसचे भजन आंदोलन

‘चोरांना सद्बुद्धी मिळो’ अशी प्रार्थना; शासनाविरोधात घोषणाबाजी करून व्यक्त केला निषेध

सावंतवाडी

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटीमध्ये झालेल्या कथित चोरीच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज सावंतवाडीत काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भजन आणि पसायदान म्हणत आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली सालईवाडा येथील श्री साईबाबा मंदिरासमोर हे आंदोलन पार पडले. यावेळी भजन आणि पसायदानाद्वारे चोरी करणाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली. तसेच या घटनेबाबत सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत निषेध नोंदविण्यात आला.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, रविंद्र म्हापसेकर, कौस्तुभ पेडणेकर, पिटर फर्नांडिस, आनंद परुळेकर, आनंद आपो, आफताब हेरेकर, प्रदीप चौगुले, ज्ञानू नमशकर, दयानंद लुडबे, आग्नेया वावडे, समीर वंजारी, यश गाटे, अरुण शिर्के, जेम्स फर्नांडिस यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा