You are currently viewing सावंतवाडी रोटरीच्या अध्यक्षपदी साई हवालदार, तर सचिवपदी सुधीर नाईक

सावंतवाडी रोटरीच्या अध्यक्षपदी साई हवालदार, तर सचिवपदी सुधीर नाईक

महिला व लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविणार ; सभागृह सुरू करण्यासाठी प्रयत्न…

सावंतवाडी

येथील रोटरीच्या अध्यक्षपदी साईप्रसाद हवालदार,तर सचिवपदी सुधीर नाईक यांची आज निवड करण्यात आली. दरम्यान यावर्षी रोटरीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, तसेच सावंतवाडी शहरातील रोटरीचे सभागृह सुरू करण्याचा आमचा मानस आहे, असे यावेळी उपस्थितांकडुन सांगण्यात आले. येथील स्नेह नागरी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वसंत करंदीकर, दिलीप म्हापसेकर, आनंद रासम, सत्यजीत धारणकर, प्रमोद भागवत, दिलीप शेवडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री हवालदार म्हणाले, लोकांच्या कल्याणासाठी मदत करण्याची कायम रोटरीची भूमिका राहीली आहे. ती परंपरा कायम ठेवत तशाच प्रकारचे सकारात्मक उपक्रम राबविण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आवश्यक असलेले सहकार्य व्हावे. दरम्यान यावेळी मावळते सचिव म्हापसेकर यांनी रोटरीकडुन मागच्यावर्षीच्या काळात कोणकोणते उपक्रम राबविले,याबाबत माहीती दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − four =