कुडाळ तालुका मनसेने जपली सामाजिक बांधिलकी…

कुडाळ तालुका मनसेने जपली सामाजिक बांधिलकी…

पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातील कोविड आयोसोलेशन केंद्रांसाठी अत्याधुनिक स्टीमर मशीन्सचे वाटप…

कुडाळ तालुका मनसे पुढील आठवडा “वृक्ष लागवड सप्ताह” साजरा करणार…तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती

कुडाळ :

आज दिनांक १४ जून रोजी मनसेचे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ तालुका मनसेच्या वतीने वेताळ बांबर्डे, डिगस, अणाव, वाडीहुमरमळा, गावातील ग्रामपंचायतींमार्फत उभारण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रांतील रुग्णांना वाफ घेण्यासाठी अत्याधुनिक स्टीमर मशिन्स( नेब्युलायझर)  ग्रामपंचायत व्यवस्थापनांकडे भेट देण्यात आल्या.यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,कुडाळ विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष गुरू मर्गज,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर गोसावी आदी उपस्थित होते. मनसेच्या या उपक्रमाचे ग्रामपातळीवरील सनियंत्रण समित्यांनी स्वागत करून आभार व्यक्त केले. कुडाळ तालुका मनसे पुढील आठवडा वृक्ष लागवड सप्ताह साजरा करणार असून तालुक्यातील महामार्गांशेजारी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेणार असल्याचे माहिती तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा