You are currently viewing स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – एकनाथ नाडकर्णी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – एकनाथ नाडकर्णी

” हर घर तिरंगा ” अभियान संयोजक, भाजपा सिंधुदुर्ग.

 प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांने आपल्या घरावर तिरंगा फडकवा..

 

भारत आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पुर्ण करणार आहे. आपण सगळेच या अत्यंत अदभुत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनणार आहोत. देवाने आपल्याला हे खुप मोठे सौभाग्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेल्या आवाहनाला सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी साथ देत दिनांक ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान स्वराज्य मोहस्तवात उस्फूर्तपणे सहभागी होऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करुया, असे प्रतिपादन भाजपा “हर घर तिरंगा” अभियानाचे जिल्हा संयोजक एकनाथ नाडकर्णी यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेे. वेंगुर्ले भाजपा कार्यकर्त्यांची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ” *स्वराज्य मोहस्तव २०२२* ” व ” *हर घर तिरंगा* ” या अभियानाची माहिती दिली. तसेच वेंगुर्ले तालुक्यातील ९३ बुथवर भाजपा चे बुथप्रमुख व बुथकमीटीतील कार्यकर्ते प्रत्येक बुथमधील कुटुंबाला तिरंगा मिळाला की नाही याची खातरजमा करून तो झेंडा कशा प्रकारे लावावा याबाबत माहिती देतील, तसेच सार्वजनिक ठिकाणी झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करतील असे नियोजन करण्यात आले.

तसेच वेंगुर्ले तालुक्यात तिरंगा मोटरसायकल रॅली, स्वच्छता अभियान, महिला बचत गटांना मार्गदर्शन, तिरंगा सायकल रॅली, शेतकरयांना मार्गदर्शन, तिरंगा दौड, वृक्षारोपण, मशाल फेरी, प्रभात फेरी, देश भक्तीपर समूहगीत स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर यांनी एकनाथ नाडकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच नगराध्यक्ष राजन गीरप यांनी वेंगुर्ले शहरातील अमृतमहोत्सव कार्यक्रमाची माहिती दिली व शहरातील कार्यकर्त्यांनी त्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष – प्रीतेश राऊळ – मनवेल फर्नांडिस – लक्ष्मीकांत कर्पे, युवा मोर्चाचे संदीप पाटील – तुषार साळगांवकर – भुषण सारंग, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.चिटणीस जयंत मोंडकर, जेष्ठ नेते प्रकाश रेगे, अॅड. जी.जी.टाककर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, महिला मोर्चाच्या – वृंदा गवडंळकर – वृंदा मोर्डेकर – आकांक्षा परब – सारिका काळसेकर, *शक्ती केंद्र प्रमुख* – महादेव नाईक (आरवली) – जगंन्नाथ राणे (रेडी) – संतोष शेटकर (तुळस) – नितीन चव्हाण (वजराठ) – कमलेश गावडे (पाल) – सुधीर गावडे (वेतोरे) – विजय बागकर (आसोली) – विद्याधर धानजी (शिरोडा) – सुनील चव्हाण (परुळे) – रुपेश राणे (कुशेवाडा) – निलेश मांजरेकर (उभादांडा), तुळस सरपंच शंकर घारे, प्रभारी ज्ञानेश्वर केळजी, शिरोडा शहर अध्यक्ष संदिप धानजी, ता.का.का.सदस्य सुनील घाग, खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर, *बुथप्रमुख* – शेखर काणेकर – नारायण गावडे – पुंडलिक हळदणकर – वसंत परब इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 2 =