You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येईल..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या प्रश्नासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येईल..

केंद्रीय पर्यटन मंञी श्रीपाद नाईक यांची घोषणा…

मालवण :

पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्र चेंबर्स आॅफ काॅमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बिच येथे पर्यटन व्यवसायिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी मा. केद्रीय पर्यटन मंञी श्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.पर्यटन व्यवसायिक महासंघ व महाराष्ट्र चेंबर्स आॅफ काॅमर्स यांच्या वतीने मा.श्रीपाद नाईक यांचा सत्कार करण्यात आला.

सुरूवातीला महासंघाचे जिल्हा सचिव अॅड. नकुल पार्सेकर यांनी चर्चासञाच्या आयोजना बाबत महासंघाची भूमिका मांडली. जिल्हा भरातून उपस्थित पर्यटन व्यवसायिकांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी व पर्यटन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना बाबत चर्चा केली.

पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी जिल्ह्यातील पर्यटन जगाच्या नकाशावर आणायचे असेल तर त्यासाठी शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली.

केद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी जे विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत ते प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील मात्र जे प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत त्यासाठी संबंधित खात्याचे अधिकारी व पर्यटन महासंघाचे पदाधिकारी यांची लवकरच बैठक आयोजित करुन निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन दिले.

यावेळी महाराष्ट्र चेंबर्स आॅफ काॅमर्स, पर्यटन विभागाच्या कोकण प्रांताचे समन्वयक म्हणून श्री बाबा मोंडकर यांची तर सदस्य म्हणून सौ. मेघा सावंत यांची नियुक्ती झाली. या दोघांचाही मा.मञी महोदयांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे, महासंघाचे उपाध्यक्ष श्री डि. के. सावंत, चेंबर्स आॅफ काॅमर्सचे उपाध्यक्ष श्री पुनाळेकर, सावंतवाडी अध्यक्ष श्री जितेंद्र पंडित, मालवणचे अध्यक्ष अविनाश सामंत, श्री गुरूनाथ राणे, सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर, महिला आघाडी उपाध्यक्षा सौ. अन्वेशा आचरेकर, हडी सरपंच महेश मांजरेकर, मालवण तालुका भाजपा अध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर , श्री अशोक सावंत, सौ. संध्या तेरसे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे श्री उमेश गाळवणकर, श्री महेश जावकर,श्री बंड्या सावंत, श्री राजू राऊळ, श्री विजय केनवडेकर , महाराष्ट्रचेंबर आॅफ काॅमर्स पर्यटन विभागाचे नवनियुक्त सदस्य श्री राजन नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा