You are currently viewing सावंतवाडी पालिकेच्या सतराही जागा राष्ट्रवादी लढविण्याच्या तयारीत…

सावंतवाडी पालिकेच्या सतराही जागा राष्ट्रवादी लढविण्याच्या तयारीत…

सावंतवाडी

आगामी काळात होणार्‍या सावंतवाडी पालिकेच्या निवडणूकीत महाविकास आघाडी होईल की नाही,याबाबत अद्याप काही सांगता येत नाही. परंतू पक्षाचा “बालेकील्ला” असलेल्या या शहरात सतराही जागा स्वबळावर लढवण्याची तयारी करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान या बैठकीत बेसिक आणि युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत जोरदार वादंग झाले. काही काम कींवा उपक्रम राबविताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप युवक पदाधिकार्‍यांकडुन करण्यात आला.
तर आम्ही मूळ कार्यकर्ते असताना आम्हाला बोलविले जात नाही.असे जुन्या कार्यकर्त्यानी सांगितले. मात्र यापुढे सर्वाना विश्वासात घेवून पक्ष वाढविला जाईल, असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी सांगितले.
राष्ट्रवादी पक्षाची बैठक आज माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, निरीक्षक शिवाजी घोगळे, आशिष कदम, माजी नगरसेवक अफोरोज राजगुरू, हिदायतूल्ला खान, दर्शना बाबर-देसाई, शैलेश लाड, असलम शेख, राजू धारपवार, अशोक पवार, इफ्तीकार राजगुरू, तेजल कदम, प्रसाद दळवी, नवल साटेलकर, अर्षद बेग आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा