You are currently viewing कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून विसर्ग सुरू

कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून विसर्ग सुरू

कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पातून विसर्ग सुरू

सिंधुदुर्गनगरी

मौजे कुणकवण येथील कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प पूर्ण संचय पातळीपर्यंत भरल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असून वाघोटन नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन लघु पटबंधारे विभागाचे पुरनियंत्रक संपर्क प्रमुख तथा उपकार्यकारी अभियंता कुणाल जाधव यांनी केले आहे.

            कोर्ले-सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये सन 2015 पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत असून धरणाची कमाल संचय पातळी 90.10 मीटर आहे. दि. 5 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजता धरण पूर्ण संचय पातळीपर्यंत भरल्याने सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीचा विचार करता व हवामान खात्याच्या अनुमानानुसार अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणाला द्वारविरहित सांडवा असल्यामुळे पर्जन्यमानानुसार विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे वाघोटन नदीची पाणीपातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे.

            तरी नदीकाठच्या ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी पावसाळा संपेपर्यंत नदीपात्रात उतरू नये आणि आवश्यक ती सावधानता बाळगावी. संभाव्य जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी या सूचनेची गांभीर्याने दखल घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा