You are currently viewing राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणूक अटीतटीची होणार…

राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणूक अटीतटीची होणार…

१५ जागांसाठी ३७ अर्ज दाखल; २४ जुलैला मतदान, दुसऱ्या दिवशी मोजणी…

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. २३ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. एकूण ३७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १५ जागांसाठी ३७ अर्ज आल्याने यावर्षी राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्था निवडणुकीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांतील वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १७ जून पासून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. २३ जून पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मदत होती. या कालावधीत एकूण ३७ अर्ज दाखल झाले आहेत. १५ जागांसाठी ३७ अर्ज आल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दरम्यान, २४ जून रोजी अर्ज छाननी होणार आहे. ११ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ठेवण्यात आला आहे. गरज पडल्यास २४ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार असून २५ रोजी मतमोजणी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २०८० एवढे मतदार निश्चित झाले आहेत. एकूण १५ संचालक निवडून द्यायचे असून एक जिल्हा मतदार संघ, आठ तालुका मतदार संघ, एक मुख्यालय मतदार संघ, तर पाच राखीव मतदार संघ आहेत. राखीव मतदार संघात दोन महिला राखीव, एक इतर मागास प्रवर्ग, एक अनुसूचित जाती किंवा जमाती, एक भटक्या विमुक्त जाती व जमाती व विशेष मागास प्रवर्ग यासाठी जागा राखीव आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा