You are currently viewing आडेली लघु पाटबंधारे प्रकल्पातून 10 जुलै रोजी नियंत्रित पाणी विसर्ग

आडेली लघु पाटबंधारे प्रकल्पातून 10 जुलै रोजी नियंत्रित पाणी विसर्ग

आडेली लघु पाटबंधारे प्रकल्पातून 10 जुलै रोजी नियंत्रित पाणी विसर्ग

झारप, कामळेवीर व आडेली परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

आडेली लघु पाटबंधारे प्रकल्प, वेंगुर्ला येथील धरणाच्या बांधाची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार दि. 10 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजता आवश्यकतेनुसार धरणाच्या सांडव्यातून नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

            धरणातून होणाऱ्या पाणी विसर्गामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या ओढा पात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे झारप, कामळेवीर व आडेली परिसरातील नागरिक, शेतकरी, मासेमारी करणारे तसेच ओढा किंवा नदीपात्र परिसरात वावरणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. नागरिकांनी ओढापात्र, पूल, बंधारे तसेच पाण्याच्या प्रवाहाच्या परिसरात अनावश्यक वावर टाळावा. तसेच नदीपात्रात जनावरे सोडणे, मासेमारी करणे, कपडे धुणे अथवा इतर कारणांसाठी नदीकाठावर जाणे टाळावे.

            संबंधित ग्रामपंचायतींनी या सूचना दवंडी, ध्वनिक्षेपक तसेच इतर उपलब्ध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा