You are currently viewing वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके बनले शेतकरी : उंबर्डेतील शेतकऱ्यांसोबत केली भात कापणी….

वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके बनले शेतकरी : उंबर्डेतील शेतकऱ्यांसोबत केली भात कापणी….

वैभववाडी

शासकीय कामानिमित्त कार्यालयात आलेल्या शेतकऱ्याचा नेहमी सन्मान करणारे वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके शुक्रवारी भात कापणीसाठी थेट शेतकऱ्यांच्या मळ्यात पोहचले. शेतकऱ्यांसोबत त्यांनी भात कापणी केली. उंबर्डे येथील जगन्नाथ बाबा खाडे व अशोक नारायण रामाने यांच्या शेतात अधिकाऱ्यांनी भात कापणी केली.

चक्क तहसीलदार यांची भातशेतीत एन्ट्री पाहून शेतकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आपली शेती आपणच टिकवली पाहिजे. प्रत्येकाने थोडी का होईना पण शेती केली पाहिजे. शेतीवर आपले कुटुंब चालते. शिवाय चांगले आरोग्य ही शेती केल्यामुळेच लाभते असे तहसीलदार श्री. झळके यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी नायब तहसीलदार अमित निंबाळकर, मंडळ अधिकारी पी.एम. पिळणकर, कृषी पर्यवेक्षक एस. एम. साखरकर, पिक विमा प्रतिनिधी राघोबा सांगेलकर, तलाठी श्री. पाटील, श्री. आमरसकर व शेतकरी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =