You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिल्हास्तरीय क्रीडा व चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिल्हास्तरीय क्रीडा व चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिल्हास्तरीय क्रीडा व चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश :

सावंतवाडी

सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व चित्रकला स्पर्धा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या गटातील चित्रकला स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा व कलागुणांचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. त्यामध्ये इयत्ता ५ वी मधील कु. सार्थक मालवणकर याने प्रथम क्रमांक तर कु. प्रार्थना नाईक हिने द्वितीय क्रमांक मिळवत शाळेचे नाव जिल्हास्तरावर उज्ज्वल केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची सर्जनशीलता, मेहनत, सातत्यपूर्ण सराव, पालकांचे सहकार्य तसेच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या जोरावर हे यश मिळवत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर, मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कु. सार्थक मालवणकर व कु. प्रार्थना नाईक यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्यांच्या भावी शैक्षणिक व कलाक्षेत्रातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा