बोगस डॉक्टर जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीवर प्रा.सुरेश पाटील यांची नियुक्ती
वैभववाडी
बोगस डॉक्टर जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीवर ग्राहक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. सुरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मा. उप सचिव, महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक सीआयएम १०९९/ प्र. क्र. ३५५/९९/ अधिनियम, मंत्रालय, दि.०७/०२/२००० अन्वये बोगस वैद्यकीय व्यवसायीक शोधून काढण्यासाठी “जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती (बोगस वैद्यकीय व्यवसायीकांना प्रतिबंध घालणे) करीता जिल्हा दंडाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सदर समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून ग्राहक संस्थेचे प्रतिनिधी म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा.सुरेश पाटील यांची सदस्य सचिव, जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती तथा पोलीस निरीक्षक, स्थागुअशा सिंधुदुर्ग यांनी नियुक्ती जाहीर केली आहे.
जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यवसायीकांचा शोध घेऊन बोगस वैद्यकीय व्यवसायीक मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रा. सुरेश पाटील यांनी सांगितले.
