You are currently viewing माई ह्युंदाई ग्रुपला “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” पुरस्कार प्राप्त

माई ह्युंदाई ग्रुपला “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” पुरस्कार प्राप्त

माई ह्युंदाई ग्रुपला “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” पुरस्कार प्राप्त

सिंधुदुर्ग

बाकू (अझरबैजान) येथे ह्युंदाई मोटर्स लि.,च्या वतीने झालेल्या “नॅशनल डीलर्स कॉन्फरन्स”मध्ये माई ह्युंदाई ग्रुपला “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” पुरस्कार प्राप्त झाला. भारतातील एकूण 600 डीलरशिप्समधून माई ह्युंदाईला हा पुरस्कार प्राप्त झाला. माई ह्युंदाईचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी माई ह्युंदाईचे डायरेक्टर दिग्विजय राजेभोसले, जनरल मॅनेजर विशाल वडेर व जनरल मॅनेजर सतीश पाटील उपस्थित होते.

माई ह्युंदाई, ह्युंदाई मोटर्सच्या पश्चिम व कोकण विभागातील आघाडीची डीलरशिप म्हणून ओळखली जाते. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात 50 हजारांहून अधिक ग्राहकांना माई ह्युंदाईने उत्तम सेवा दिली आहे. ग्राहक सेवेबद्दल यापूर्वीही अनेकदा माई ह्युंदाईला गौरवण्यात आलं आहे. नवीन वर्षातील हा पुरस्कार माई ह्युंदाई ग्रुपला प्रेरणा देणारा आहे आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. माई ह्युंदाईच्या या गौरवाबद्दल आमचे ग्राहक, कर्मचारी, व्हेंडर्स या सर्वांना मी धन्यवाद देतो, असं प्रतिपादन मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी केलं..

प्रतिक्रिया व्यक्त करा