You are currently viewing बेळगाव, वेंगुर्ला कांबळे वीर मार्गे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा दिवसांची डेडलाईन

बेळगाव, वेंगुर्ला कांबळे वीर मार्गे जाणाऱ्या रस्त्यासाठी दहा दिवसांची डेडलाईन

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी विचारला जाब : अधिकाऱ्यांनी दिले खड्डे बुजविण्याचे आश्वासन

सावंतवाडी

बेळगाव वेंगुर्ला कांबळेवीर मार्गे जाणारा रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नसल्याने इथून जाणाऱ्या वानधारकांचे हाल होत आहेत. त्यामुळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह येथील बांधकाम विभागात जात जाब विचारला. यावेळी येत्या दहा दिवसात सदर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील असे आश्वासन सौ. अनामिका चव्हाण यांनी यावेळी दिले.

तसेच येत्या दहा दिवसात जर रस्ता खड्डे बुजवण्याचे काम सुरू न झाल्यास खड्ड्यात झाड लावण्यात येईल असा इशारा देखील तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी यावेळी दिला.

यावेळी चंद्रकांत कासार, बाळा गावडे, आबा सावंत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा