You are currently viewing न्यू पूना पब्लिक स्कूल चे साम्बो स्पर्धेत दैदिप्यमान यश

न्यू पूना पब्लिक स्कूल चे साम्बो स्पर्धेत दैदिप्यमान यश

निगडी प्राधिकरण- (प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

 

छत्रपती संभाजी नगर येथे तिसरी महाराष्ट्र राज्य स्तरीय साम्बो स्पोर्ट चॅंपियन शिप स्पर्धा नुकतीच पार पडली. १५९देशांतून या स्पर्धा दरवर्षी होतात.

प्राधिकरण मधील सी बी एस ई ची प्रथितयश शाळा न्यू पूना पब्लिक स्कूल ची टीम शाळेतर्फे गेली होती.

वय आणि वजन यावर झालेल्या स्पर्धेत शाळेने तिसरा क्रमांक पटकावला. एकूण ३७ मेडल्स विद्यार्थ्यांनी मिळविली. क्रिडा शिक्षक मनिषा पाटील यांनी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन मधील मा.प्रकाश खंदारे आणि प्रदीप खंदारे यांनी प्रोत्साहन दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा