*अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी तथा श्रीशब्द लालित्य समूह प्रशासक व जागतिक साकव्य विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कुठे शोधावा ईश्वर*
(पादाकुलक वृत्त)
शोधू कोठे सांगा ईश्वर
सापडतो का कुणा खरोखर
कुणी सांगती मन गाभारी
देवळातही बसे निरंतर
झाडे वेली सजीवसृष्टी
प्रत्येकाच्या ठायी वसतो
भार संकटी सहज पेलतो
कुठे कुणाला तेंव्हा दिसतो
खडकालाही पाझर फुटतो
चमत्कार की म्हणुया गहिवर
अस्तित्व दिसे चराचरी जर…
पुजू नये का सांगा फत्तर..?
सूर्य उगवणे अन् मावळणे
चंद्र कलांनी बदलत जाणे
उंच हिमालय उगम नदीचा
अफाट सागर खारट होणे
देह मानवी मांस नि हाडे
रक्तात तरी चैतन्य असे
श्वास असावा अंश ईश्वरी
जीवात्म्याला नाकारु कसे..?
भक्तीत जसा मग्न जाहलो
अथांग शांती लाभली उरी
बदलुन दृष्टी सृष्टी पहावी
आत्मा हाची देव अंतरी
✒️दीपक पटेकर (दीपी)
सावंतवाडी
८४४६७४३१९६
