*श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री कांचनगंगा मोरे यांनी “बकुळीची फुले” काव्यसंग्रहाचे केलेलं परीक्षण*
*अवीट शब्द गंधाने दरवळणारी -* *बकुळीची फुले*
✒️कवी: दीपक पटेकर (दीपी), सावंतवाडी
🖊️परीक्षण: कांचनगंगा मोरे,
सुप्रसिद्ध कवी लेखक दिपक पटेकर यांचा बकुळीची फुले हा काव्यसंग्रह हातात आला आणि मुखपृष्ठ पाहूनच शब्द दरवळाने मन गंधीत झाले.
एका आदर्श कवीची सर्व लक्षणे कवी दिपक पटेकर यांच्यामध्ये पहायला मिळतात. त्यांची काव्यसाधना ही खूप दिवसापासून चालू आहे त्यामूळे ते एक अनुभवी कवी आहेत. अभ्यासू वृत्तीतून फुललेली ही शब्द फुले म्हणूनच प्रगल्भ कवितेचे रूप घेऊन समोर येतात. खऱ्या कवीची वा लेखकांची ज्ञानसाधना अखंड चालू असते. ते आपले लेखन कार्य अविरतपणे करत असतात. विविध साहित्यप्रकारात ते सतत लिहितात. दिपक दादांच्या कविता सुद्धा विविध काव्य प्रकारात बहरल्या आहेत. तसेच त्यांनी कवितेचे विविध विषय हाताळले आहेत. निसर्ग, शृंगार, प्रेम, राजकीय, सामाजिक अशा वीविध विषयावरच्या कविता आपल्याला बकुळीची फुले या संग्रहात आस्वादायला मिळतात. एक अभ्यासू आणि अनुभवी कवी असलेल्या कवीच्या या संग्रहातील कविता आशयसंपन्न आणि प्रगल्भ असल्याचे जाणवते. समाजातील बेफिकर व स्वार्थी वृत्तीचा परामर्ष घेताना कवीच्या स्वअनुभूतीतून स्फूरलेल्या काही कविता
*उजाड डोंगर नि पायथ्याशी*
*नदी वाहते तुडुंब पाणी*
*कुठे कुणाला व्यथा कळाली*
*तरु गातसे सोशिक गाणी*
या ओळीतून बोथट झालेल्या मानवी भावनाना जबाबदारीचे भानही देताना दिसतात. तरल भावमधुर्य, लालित्यपूर्ण शब्दात निसर्ग सौंदर्याचे वर्णन. यामूळे या कविता मनाला आनंद देऊन जातात.
वृत्तबद्ध कविता हे अनमोल वैशिष्टय घेऊन तयार झालेल्या अशा या सुंदर काव्यसंग्रहातील बकुळ फुलांची एकेक पाकळी आस्वादताना
*दवबिंदूंचे तुषार झाले पानावरती गोळा*
*जणू सकाळी मोतीयांचा भरला होता मेळा*
या सुंदर लयबद्ध ओळी निसर्गाचा एक अद्भुत क्षण अगदी सहज डोळ्यासमोर उभा करतात…! निसर्गचित्र वर्णनासह मानवी भाव भावनांचे सूक्ष्म कंगोरे अतिशय तरल शब्दात टिपत जाणाऱ्या या कविता मन मंत्रमुग्ध करतात. काव्यमय शब्दातील वृतात बांधल्यामुळे येणारे नाद माधुर्य जे आज दुर्मिळ आहे ते
*कणखर फांदी त्यावर शोभे*
*हिरवे हिरवे पर्ण कोवळे*
*छटा गुलाबी मोहक भासे*
*वसंतातले जणू सोहळे*
या ओळीतून अनुभवायला मिळते.
*मी मी म्हणूनी गर्व बाळगी*
*क्षणभंगूर हे आहे जीवन*
*क्षणात असतो क्षणात जातो*
*जीव कुणाचा नसतो पावन*
या ओळी जीवनातील क्षणाभंगुरतेवर अचूक बोट ठेवतात.
या आणि अशाच आस्वादक कवितांचा हा मनोहर खजिना माझ्या संग्रही मिळाला याचा मनातून आनंद होतोय धन्यवाद दादा माझ्यासाठी ही अनमोल भेट पाठवलीत त्याबद्धल मनापासून आभार 🙏🏻
🖊️कांचनगंगा मोरे
काक्रंबा, तुळजापूर
_________________________
*संवाद मीडिया*
*प्रवेश सुरू!! प्रवेश सुरू!!!*
*कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण*
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आणि स्थापनेपासून *”अ”* दर्जा प्राप्त *महाविद्यालये*
*बारावी नंतर कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू….!!!*
1) *गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण.*
*कॉलेज कोड:* *11165*
*👇अभ्यासक्रम*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.) Agriculture
प्रवेश क्षमता- 180
*संपर्क : 9421154594 9421230915 9405071319*
www.gncamp.org
2) *जिजामाता महिला कृषी महाविद्यालय मांडकी पालवण*.
*देशातील पहिले महिला कृषी महाविद्यालय*
*कॉलेज कोड:* *11311*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी पदवी- BSc. (Hons.)Agriculture
प्रवेश क्षमता- 60
*संपर्क : 8600879426 7588868705*
www.jwcagri.org
3) *डॉ.बुधाजीराव मुळीक कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मांडकी पालवण*
*कॉलेज कोड:* *15196*
*👇अभ्यासक्रम.*
▪️कृषी अभियांत्रिकी पदवी-(Agricultural engineering)
प्रवेश क्षमता- 80
*संपर्क: 9421154594 7588868705*
www.dbmcaetmp.org
*टीप : इच्छुक विद्यार्थ्यांचे फॉर्म कॉलेजमध्ये भरून देण्यात येतील*
*प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयाचे व्हाट्सअप channel जॉईन करा*
https://whatsapp.com/channel/0029Vb2OWKRJENxsbWsAQ41a
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/207281/
https://www.facebook.com/share/p/1LPFm2kaQQ/
_________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
