You are currently viewing ज्योत

ज्योत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सुजाता नवनाथ पुरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

*ज्योत*

निरंजनाची ज्योत सांगते
बाईच्या जन्माची कथा..
शब्दा पलीकडे असते
हसऱ्या चेहऱ्याची व्यथा..

मिणमिणते अख्खी जिंदगी
उजळण्यासाठी स्वतः च घर..
कष्ट सोसूनही नसतो.
चकार शब्द ओठांवर ..

प्रकाश देताना नियमित
नसतो हक्क काळवंडण्याचा..
करायचा असतो सराव
हिशेब संसाराचा मांडण्याचा..

कधी सकाळी,कधी दुपारी
ज्योत बनून जळायचं..
कातरवेळ झाली की
स्वयंपाक घराकडे वळायचं..

रात्रीची शेजारती झाल्यावर
हळूच तिने विझायच ….
काकड आरती करण्यासाठी
पुन्हा नव्यानं रूजायच..

सुजाता नवनाथ पुरी
अहमदनगर
8421426337

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + three =