You are currently viewing एमआयटी पुणेच्या सिव्हिल विभागात मालवणच्या ओंकार गावकरचा प्रथम क्रमांक; गोल्ड मेडल पटकावले

एमआयटी पुणेच्या सिव्हिल विभागात मालवणच्या ओंकार गावकरचा प्रथम क्रमांक; गोल्ड मेडल पटकावले

एमआयटी पुणेच्या सिव्हिल विभागात मालवणच्या ओंकार गावकरचा प्रथम क्रमांक; गोल्ड मेडल पटकावले

डिस्टिंक्शनसह कॉलेजमध्ये अव्वल; डिप्लोमा आणि दहावीनंतर पदवीतही उज्ज्वल यश, सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा

सावंतवाडी

एमआयटी, पुणे (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी)च्या सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात मालवण येथील ओंकार विकास गावकर याने संपूर्ण कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवत डिस्टिंक्शनसह गोल्ड मेडल पटकावले आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

ओंकार गावकर याने यापूर्वी पुण्यातील ए.आय.एस.एस.एम.एस. महाविद्यालयातून सिव्हिल अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केला होता. डिप्लोमा अभ्यासक्रमातही त्याने महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. त्यानंतर त्याने एमआयटी, पुणे येथून सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन शाखेची पदवी पूर्ण केली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात त्याने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवत सातत्यपूर्ण यशाची परंपरा कायम राखली.

ओंकारने शालेय जीवनातही उत्कृष्ट कामगिरी केली होती. कुडाळ हायस्कूलमधून दहावीच्या परीक्षेत ९७.६० टक्के गुण मिळवत त्याने उल्लेखनीय यश संपादन केले होते. त्यानंतर डिप्लोमा आणि आता पदवी शिक्षणातही अव्वल स्थान पटकावत त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे.

ओंकार गावकर यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा