You are currently viewing मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर व मयुरेश मालवणकर जिल्ह्यातील पहिले राज्य बुद्धिबळ पंच
Oplus_16908288

मुक्ताई ॲकेडमीचे बाळकृष्ण पेडणेकर व मयुरेश मालवणकर जिल्ह्यातील पहिले राज्य बुद्धिबळ पंच

सावंतवाडी :

महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांनी संयुक्तरित्या रत्नागिरी येथे राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच-आर्बिटर लेखी परीक्षेचे आयोजन केले. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनतर्फे प्रथम दोन दिवसाची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळा आणि पंच परीक्षेत राज्यातील तब्बल पंचेचाळीस जणांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचा सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर व मालवणचा मयुरेश मालवणकर यांनी कार्यशाळेत सहभाग घेतला आणि पंच परीक्षा दिली. पंच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून बाळकृष्ण व मयुरेश चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनने बाळकृष्ण व मयुरेश राज्यस्तरीय पंच झाल्याचे जाहीर केले. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थ्यांनी हे यश संपादन केले. ॲकेडमीच्या सचिव सौ.स्नेहा कौस्तुभ पेडणेकर यांनी यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन करतानाच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व स्तरातून यशस्वी विदयार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा