You are currently viewing स्मृति भाग २९

स्मृति भाग २९

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग २९*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण *व्यास* स्मृतिमधील काही विचारधन पहात आहोत . त्यांच्या स्मृतितील चवथ्या अध्यायात पुढील श्लोक येतात .

 

*इन्द्रियाणि वशीकृत्य गृह एव वसेन्नरः ।*

*तत्र तस्य कुरुक्षेत्रं नैमिषं पुष्कराणि च॥*

*गङ्गाद्वारञ्च केदारं सन्निहती तथैव च।*

*एतानि सर्वतीर्थानि कृत्वा पापैः प्रमुच्यते ॥*

इन्द्रियांना वश करुन मनुष्याने आपल्या घरीच वास करावा . तेच त्याचे कुरुक्षेत्र आहे , नैमिष आहे , आणि पुष्कर आहे .

तेच त्याचे गंगाद्वार म्हणजे हरिद्वार आहे , केदारनाथ आहे आणि सन्निहती तीर्थ ( कुरुक्षेत्राजवळील ) आहे .

सध्याच्या *कोरोना* राक्षसाच्या काळात ( रक्षति इति राक्षसः । जो रक्षण करतो तो राक्षस ! व कोरोना हा फक्त प्रेतांचे रक्षण करत बसलाय ? म्हणून राक्षस म्हटले !!😃😃) मनुष्यास घरी राहण्याचा सल्ला किती गोड वाटतो ना ? लहानपणी ऐकले होते की मनुष्यास संध्या वा प्रार्थना करण्याची तीन दिवस सूट असते , प्रवासामुळे ! पण चवथ्या दिवशी नाही ! याचा सरळ अर्थ त्याने घरीच यावे असा असावा ना ? घराच्या रक्षणासाठी कर्त्याने घराकडे सातत्याने लक्ष दिले पाहिजे , यासाठीच हा श्लोक असावा ! पण अन्य तीर्थांसह कुरुक्षेत्राचेही नाव व्यासमहर्षिंनी घेतले आहे ! गीतेची तर पहिलीच ओळ वा पहिले दोन शब्द ” धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे ” अशी आहे ! या कुरुक्षेत्राच्या युद्धात ” घर ” विसरु नये म्हणजे घरातील व्यक्ति विसरु नये ! यासाठीच हा श्लोक रचला असावा ना ! गृहस्थाश्रम टिकला पाहिजे , तो मोडकळीस कुणाचाही येवू नये , यासाठी ऋषिंचा केवढा आटापिटा ???

*जीवन म्हणजे युद्धच केवळ*

*नसता पाठीशी संख्याबळ*

*” माम् अनुस्मर युद्ध्य च ” हे सांगे योगेश्वर ।*

ही स्वाध्यायी गीताची ओळ सहज सुचते अशा वेळी ! जीवन हेच कुरुक्षेत्र ही व धर्मक्षेत्र ही !! त्यात देवालाही विसरु नये , म्हणून घरातच सर्व तीर्थांचा वास असतो ! हे सांगितले आहे . कारण माणूस कुठे व कशा चुका करेल ? पुढे काळ कसा येईल ? हे स्वतःचे दीर्घदृष्टीने ते पहात असावेत ! ऋषिंचे योगदान विसरणारे माणसांना काय म्हणावे ? पुढे ,

 

*अशाश्वतानि गात्राणि विभवो नैव शाश्वतः ।*

*नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्म संग्रहः ॥*

शरीर नेहेमी रहाणार नाही , धन ही सतत रहाणार नाही , मृत्यु सतत जवळ विद्यमान असतो म्हणून धर्माचा संग्रह केला पाहिजे .

केवढा मोठा विचार दोन ओळीत ! ” यतो धर्मस्ततो जयः । ” ” धर्मो रक्षति रक्षिताः । ” असे आहे म्हणून धर्माचा संग्रह करावयास सांगितला आहे . एवढे मोठे शास्त्र जेथे सांगितले गेले ते सर्व उद्ध्वस्त करण्यासाठी ” धर्मनिरपेक्षतेचे ” आतंकी घोडे जेंव्हा माझ्याच संस्कृतीमधील माणसं दौडवतात व सर्वसामान्यांची दिशाभूल करतात ते किती पापकर्म करत असावेत ?

 

*यदि नाम न धर्माय न कामाय न कीर्तये ।*

*यत्परित्यज्य गन्तव्यं तद्धनं किं न दीयते ॥*

जर धनाने धर्म कमावला नाही , आपल्या इच्छांची पूर्ती केली नाही , यशाची वृद्धि केली नाही , तर त्या धनाचे दान का नाही केले जात ?

प्रश्न तर फक्त सुंदर नाही तर विचार करण्याजोगाही आहे .

 

*जीवन्ति जीविते यस्य विप्रा मित्राणि बान्धवाः ।*

*जीवितं सफलं तस्य आत्मार्थे को न जीवति ॥*

 

*पशवोSपि हि जीवन्ति केवलात्मोदरम्भराः।*

*किं कायेन सुगुप्तेन बलिना चिरजीविना ॥*

ज्याच्या जगण्याने विप्र , मित्र व बान्धव जिवन्त राहतात , त्याचेच जीवन सफल आहे . आपल्यासाठी कोण जगत नाही ?

केवळ आपल्या उदरपूर्तीसाठी जनावरे ही जगतात . म्हणून खूप जतन केलेले , बलवान व चिरकाल टिकणार्‍या शरीरापासून काय लाभ ??

इथे विप्र शब्द वापरलाय !! ” विद्याभ्यासी भवेत्विप्रः । ” म्हणजे विद्येचा अभ्यास करणार्‍यास विप्र म्हणतात ! शिक्षण दोन प्रकारचे . १) उदरभरणासाठी दिले जाणारे ( bread oriented ) व २) बुद्धिपोषणास्तव दिले जाणारे ( brain oriented ) विप्र हे दुसर्‍या प्रकारात येतात , हे जाणावे . उदराभरण करुन ब्राह्मण्य मिरवणारे यात अजिबात येत नाहीत . कारण उदराभरण तर पशू ही करतात !! हे ही त्यांनी लगेच सांगितले आहे !! गोब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराजांचे नाव घेत गो ब्राह्मणांचीच हत्या आज देशात होत असेल तर साधारण माणसांनी कसं वागावं ???? असो , आज थांबतो .

पुन्हा प्रश्न येतोच !! पण असे श्लोक सांगणारे ऋषि वाईट असतील ?

सांगणे येवढेच ऋषिंना विसरु नका हो कुणी !🙏🙏

विनंती इतकीच , व्यास स्मृति व इतरही स्मृति वाचनीयच आहे . वाचाल ना ?🙏🙏 उद्या काही श्लोक पाहू .

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩‍💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗

 

*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻‍♀️संधीचा लाभ घ्या🤩

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४

 

*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी

 

♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४

 

*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा

 

👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*

 

👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

 

👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)

 

👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता

 

👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल

 

👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳

 

👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜

 

👉 *Personal attention with hands on practice*

 

👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗

 

📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा