You are currently viewing आज तरी ये पावसा

आज तरी ये पावसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आज तरी ये पावसा*

 

आज तरी यावा पाऊस धरतीला वाटे,

भेगाळली भुई वावर झाले कोरडे.

आकाशात जमती कृष्णमेघ दांडगे,

पावसा बरस आता घालतो आम्ही सांकडे.

 

सृष्टीची झाली काहिली वैषाख सोसून,

बळीराजा थकला रे डोळे लाऊन,

मृगाचे तुषार जाना रे बरसुन,

धरतीमातेला जा चिंब भिजवून.

 

बरसशील झिम्माड सरींनी,

मातीचा गंध वेडावेल मना रानीवनी,

फुटतील धुमारे पानोपानी,

सजेल धरती हिरव्या रंगछटांनी.

 

अचानक आले अंधारुनी,

आभाळ भरले काजळ जलमेघांनी,

वारा झाला सुसाट गेला बहकुनी,

नभांगणी आले जलकुंभ ओथंबूनी.

 

ये रे पावसा आता नको आंस लावू,

कोसळ आता सहस्त्र जलधारांनी,

नखशिखांत तृप्त होईल अवनी,

लक्ष लक्ष बीजे अंकूरतील जाईल सुखाऊनी.

 

येईल रात्र रातराणी होऊनी,

कोण जागवेल रात्र मारवा गाऊनी,

मोगरा जाई फुलतील शुभ्ररंगानी,

अरे पावसा झालो आतुर आता आज जा बरसुनी.

 

अनुराधा जोशी.

अंधेरी मुंब ई 69

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा