मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; “अजित पवारांनी दिलं कारण”

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; “अजित पवारांनी दिलं कारण”

दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असं शरद पवार यांचं मत असल्याचं समजतं. त्यामुळे मुख्यमंत्री शेतकरी आंदोलनात येतील की नाही? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (uddhav thackeray should not attend farmers march says sharad pawar)

मुख्यमंत्रीपद हे घटनात्मकपद आहे.

त्यामुळे त्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये, असं शरद पवार यांना वाटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय मुंबईत कोरोनाचं संकटही आहे. त्यामुळेही मुख्यमंत्र्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असंही पवारांचं मत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा