You are currently viewing मळेवाड येथे दुचाकी अपघात बेळगाव येथील दोघे जखमी…

मळेवाड येथे दुचाकी अपघात बेळगाव येथील दोघे जखमी…

मळेवाड येथे दुचाकी अपघात बेळगाव येथील दोघे जखमी…

सावंतवाडी

मळेवाड येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात बेळगाव येथील दोघेजण जखमी झाले आहेत. दयानंद शेट्टीगर ( वय ५४ ) व मुकुंद मुतकेकर ( वय ५० ) अशी त्यांची नावे असून दयानंद शेट्टीगर यांच्या पायाला दुखापत झाली आहे. तर अपघातानंतर दुसऱ्या दुचाकी चालकाने पळ काढला ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मळेवाड येथे घडली.

दरम्यान जखमी शेट्टीगर यांना उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांनी अधिक उपचारासाठी आपण बेळगाव येथे जात असल्याचे पोलिसांना सांगितले या अपघाताबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा