You are currently viewing सहकारमहर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त २७ रोजी रक्तदान शिबीर

सहकारमहर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त २७ रोजी रक्तदान शिबीर

कट्टा कावळेवाडी येथे आयोजन : वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप आणि जी एच फिटनेस कट्टा यांचा पुढाकार

मालवण :

सहकार महर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वराड कुसरवे रक्तदाते ग्रुप आणि जी एच फिटनेस कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२.३० पर्यंत डी. बी. ढोलम यांच्या कट्टा कावळेवाडी येथील निवासस्थानी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

वराड कुसरवे रक्तदाते ग्रुपच्या वतीने १९ जून २०२० पासून आयोजित केलेले हे पाचवे रक्तदान शिबिर आहे. नवनवीन रक्तदात्याना रक्तदानासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हा ग्रुप कार्यरत आहे. सहकारमहर्षी कै. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २७ रोजी हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असून रक्तदात्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा