You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५६ पी. पी. ई. किटचे वाटप…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५६ पी. पी. ई. किटचे वाटप…

कोरोनाचा पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचा उपक्रम…

वेंगुर्ला :

कोरोना महामारीत रुग्णसेवा करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना विश्व हिंदू परिषद सिंधुदुर्गतर्फे पी. पी. ई. किटचे वाटप करण्यात आले. यात वेंगुर्ला नगरपरिषदेला २०, सावंतवाडीत नगरपरिषदेला १९ तर जिल्हा रुग्णालयाला ११७ पी. पी. ई. किटचा समावेश आहे.
सदरचे किट वाटप वेंगुर्ला तालुका प्रखंड अध्यक्ष अरुण गोगटे, जिल्हा सहमंत्री गिरीष फाटक, मातृशक्ती प्रखंड प्रतिक्षा जोशी, दुर्गा वाहिनी प्रखंड प्रमुख ॲड. नविना राऊळ, वेंगुर्ला प्रखंड सहमंत्री महेश वेंगुर्लेकर, उद्योजक नितीन पटेल आदींच्या हस्ते करण्यात आले. किट वाटप करताना वेंगुर्ला येथे नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल, रवि शिरसाट आदी, जिल्हा रुग्णालयात शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. चव्हाण, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश नलिवडे, औषध निर्माण अधिकारी डॉ. अनिलकुमार देसाई, विक्रमादित्य शिरसाट तर सावंतवाडी येथे मुख्याधिकारी झिरगे, लक्ष्मीकांत कराड, सुनिल सावंत, रुपेश पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष रवि सातावळेकर, जिल्हाध्यक्ष अजित फाटक, जिल्हा मातृशक्ती प्रमुख नेत्राताई मुळे, जिल्हा संयोजक महादेव राऊळ, सावंतवाडी प्रखंड मातृशक्तीच्या डॉ. माधुरी शिरसाट व वर्षा मडगांवकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + eighteen =