You are currently viewing सातारा : खंबाटकी घाटात अग्नितांडव

सातारा : खंबाटकी घाटात अग्नितांडव

वणव्यात ट्रक आणि कार जळून खाक

खंडाळा

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात आज  दुपारी वणवा पेटला. यात घटनेत एक ट्रक व कार पेटली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महामार्गावरील या अग्नितांडवाने खळबळ उडाली असून घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वणवा विझवण्याबरोबरच घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबली आहे.

बुधवारी दुपारी दीड वाजता घाटातून धुराचे लोट दिसू लागले. दरम्यान, काही क्षणातच आगीचे व धुराचे प्रमाण वाढल्याने परिसरात खळबळ उडाली.आगीमुळे वाहन चालकांची भंबेरी उडाल्याने वाहनांची कोंडी झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + 20 =