You are currently viewing आंबोली घाटात सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी…

आंबोली घाटात सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी…

आंबोली घाटात सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी…

ग्रामस्थांकडून प्रकार उघड; वनविभागाच्या कारवाई बाबत प्रश्नचिन्ह…

सावंतवाडी

जैवविविधतेने समृद्ध असलेल्या आंबोली घाटात काही परप्रांतीय लोकांकडून कॅन्सर सारख्या आजारावर औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या सप्तपर्णी सारख्या दुर्मिळ वनौषधींची तस्करी केली जात आहे. हा प्रकार करणाऱ्या तस्करांना काल रंगेहात वनविभागाच्या पथकाकडून पकडण्यात आले. ही कारवाई नानापाणी परिसरात करण्यात आली. मात्र याबाबत पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. याबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे तस्करी करणाऱ्या व वनौषधींचा ठेवा नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित तस्करांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी तसेच हे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी योग्य ते प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार नानापाणी परिसरात काही व्यक्तींनी घाटात आढळणाऱ्या दुर्मिळ वनस्पतीची तोड केली आहे. हा प्रकार गेले अनेक दिवस सुरू आहे. याबाबतची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने त्या ठिकाणी येऊन संबंधित तस्करांना रंगेहाथ पकडले. मात्र त्यांच्यावर पुढे नेमकी कोणती कारवाई झाली? याबाबत माहिती मिळू शकली नाही. सुरू असलेल्या प्रकार अत्यंत निंदनिय आहे. आंबोली घाट हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी नैसर्गिक ठेवा आहे. त्यामुळे अशा प्रकारे तस्करी झाल्यास त्याचा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबत लवकरात-लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत आंबोली वनविभागाशी संपर्क साधला असता. झालेली तोड ही मालकी क्षेत्रात करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती आणि ठेकेदाराचे जाब-जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. जलपर्णी जप्त करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

*संवाद मीडिया*

*प्रवेश सुरु… प्रवेश सुरु…प्रवेश सुरु…….*

*शैक्षणिक वर्ष 2024-2025*

*संपूर्ण कोकणात गेली 20 वर्षे नर्सिंग क्षेत्रात काम करण्याचाअनुभव असलेल्या*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग, दापोली.*

*(MSBNPE,INC,MNC व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)* मध्ये नर्सिंग करण्याची सुवर्ण संधी

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2024-2025*

🔸 *कोर्सचेनांव-
*जनरल नर्सिंग मिडवाइफरी (GNM)*
Eligibility- 12th Pass Any Stream
• Duration : 3 Years

*ऑक्सीलियरी नर्सिंग मिडवाइफरी(ANM)* • Eligibility- 12th Pass
Any Stream
• Duration : 2 years

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(*शासन नियमानुसार).*
*संधी* –
🔸संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या शहरात शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये 100% नोकरीची संधी उपलब्ध.

*आपला प्रवेश लवकरच निश्चित करा.*
👉🏻 *संपर्क* –
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
*संपर्क:*
*9145623747*
*9420156771*
*7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138412/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा