You are currently viewing बांदा आळवाडा बाजारपेठेतील पाणी ओसरले

बांदा आळवाडा बाजारपेठेतील पाणी ओसरले

येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितल्याने प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा..

 

बांदा :

 

तेरेखोल नदी किनारी असलेल्या बांदा-आळवाडा बाजारपेठेत आज रविवारी सकाळी पाणी घुसल्याने याठिकाणचे जनजीवन विस्कळीत होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु दुपारी १२ नंतर पावसाचा जोर ओसरल्याने याठिकाणी घुसलेले पुराचे पाणीही ओसरले असून येथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या पुराच्या पाण्यापासून मुख्य बांदा बाजारपेठ दूर असल्याने सुरक्षित आहे. याठिकाणी कोणताही धोका नाही. प्रशासनाने येत्या २४ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 8 =