You are currently viewing केंद्रशाळा शेर्पे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

केंद्रशाळा शेर्पे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात संपन्न

सहभागी शाळा – केंद्रशाळा शेर्पे, कुरंगवणे खैराट , कुरंगवणे भंडार, कुरंगवणे पश्चिम, बेर्ले .

केंद्रशाळा शेर्पे या शाळेत नुकताच शाळा पूर्वतयारी मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बाधकाम सभापती रविंद्र जठार व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना रवींद्र जठार म्हणाले शेर्पे केंद्रातील शाळांचे शैक्षणिक कामकाज व्यवस्थित सुरू असून शिक्षक विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना घडवीत आहेत . प्रास्ताविक श्री दशरथ शिंगारे यांनी केले. त्यात त्यांनी मेळाव्याचे रूपरेषा कथन केली. तरळे बीटाचे विस्तार अधिकारी सुहास सखाराम पाताडे यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या व शैक्षणिक मार्गदर्शन केले . रविंद्र जठार यांनी मेळाव्याला मांडलेल्या स्टॉलचे उद्घाटन फित कापून केले.

यावेळी कुरंगवणे गावचे उपसरपंच संतोष ब्रह्मदंडे , शेर्पे गावचे उपसरपंच श्री. अरुण ब्रह्मदंडे , शाळा व्यवस्थापन अध्यक्ष – विलास पांचाळ उपस्थित होते . यावेळी अरुण ब्रम्हदंडे व संतोष ब्रम्हदंडे यांनी मेळाव्याला शुभेच्छा दिल्या. नवीन दाखल होणाऱ्या मुलांचे पहिले पाऊल वर्गात टाकण्यात आले. औक्षण करण्यात आले. विविध बौद्धिक भावनिक व शारीरिक विकास खेळ घेण्यात आले. यावेळी शेर्पे गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. आकर्षक सेल्पी पॉईंट व सुंदर व आकर्षक रांगोळी ने सजावट केली होती . याप्रसंगी शेर्पे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री विलास पांचाळ,बेर्ले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रणया राऊत, कुरंगवणे पश्चिम शाळेचे अध्यक्ष प्रमोद गाडे, सदस्य श्री प्रमोद लाड ,कुरंगवणे खैराट शाळेचे अध्यक्ष सदाशिव कुडाळकर आणि कुरंगवणे भंडारवाडी शाळेचे अध्यक्ष प्रणाली पाटील उपस्थित होते. शेर्पे केंद्रशाळचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे, कुरंगवणे खैराट शाळेचे मुख्याध्यापक श्रीपाद बागडी,कुरंगवणे भंडारवाडी शाळेचे मुख्याध्यापक सखाराम खरात, बेर्ले शाळेचे मुख्याध्यापक राजू गर्जे ,कुरंगवणे पश्चिम शाळेचे मुख्याध्यापक आशिष दुधे उपस्थित होते. शेर्पे शाळेचे शिक्षक श्री अमोल भंडारी, शिक्षिका दिपाली खुंटाले, तसेच बेर्ले शाळेच्या शिक्षिका शारदा तांदळे ,.कुरंगवणे खैराट शाळेचे शिक्षक गोरक्षनाथ गायकवाड व अमोल शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल भंडारी यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दशरथ शिंगारे यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा