You are currently viewing जलजीवनमिशन अंतर्गत अध्याप 1% ही काम नाही

जलजीवनमिशन अंतर्गत अध्याप 1% ही काम नाही

ओरोस :

जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यात 2020-21 मध्ये 1 लाख 21 हजार 256 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. मात्र 2021- 22 या चालू आर्थिक वर्षातील गेल्या चार महिन्यात अध्याप एक टक्काही काम झाले नसल्याचे गुरुवारी झालेल्या जलव्यवस्थापन समिती सभेत उघड झाले.

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली  छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. समिती सचीव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सभापती अंकुश जाधव, महेंद्र चव्हाण, शर्वांनी गावकर, समिती सरोज परब, पल्लवी राऊळ, आदी सर्व खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सभेत जल जीवन मिशन अंतर्गत कामाचा आढावा घेतला असता जिल्ह्यात सन 2020- 21 साठी 1 लाख 89 हजार 270 कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी मार्च 2021 अखेर 1 लाख 21 हजार 256 कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. तसेच 2021-22 साठी मिळालेल्या 68 हजार 014 नळजोडणी चे उद्दिष्टापैकी गेल्या चार महिन्यात 643 कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा करून आतापर्यंत 0.95 टक्के एवढे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सभेत उघड झाली आहे. यावेळी पावसामुळे कामाची गती मंदावलेली दिसत असली. तरी पाऊस कमी होताच जल जीवन मिशनच्या कामाला गती येईल. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर 8 कोटी 20 लाख खर्चाची 85 कामे व जिल्हास्तरावर 12 कोटी 90 लाख खर्चाची 57 कामे नव्याने मंजूर करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली.

तसेच बांदा ते दोडामार्ग रस्त्याची दुर्दशा झाल्याने हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. याबाबत गेले वर्षभर सभेत विषय मांडूनही या रस्त्याची डागडुजी झालेली नाही. अधिकारी गांभीर्याने दखल घेत नाही. याबाबत उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले व तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =