You are currently viewing कुंभवडे ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिननिमित्त पाककला स्पर्धा व महिला शेतकरी मेळावा संपन्न

कुंभवडे ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिननिमित्त पाककला स्पर्धा व महिला शेतकरी मेळावा संपन्न

कणकवली :

कणकवलीत कुंभवडे ग्रामपंचायत येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत, जागतिक महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा व महिला शेतकरी मेळावा बुधवार दिनांक ८ मार्चला रोजी सकाळी ११.०० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत कुंभवडे यांच्या संयुक्त विद्यमाने  संपन्न झाला.

यावेळी सांगवे कृषी पर्यवेक्षिका श्रीम.व्ही. व्ही. ठाकूर यांनी पौष्टिक तृणधान्या बद्दल व कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत उपस्थित महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच पाककला स्पर्धेमध्ये पौष्टिक तृणधान्य पासून तयार करण्यात आलेल्या विविध पदार्थांचे परीक्षण करून प्रथम क्रमांक सार्थक स्वयंसहाय्यता महिला बचत गट ,द्वितीय क्रमांक भरारी स्वयंसहाय्यता महिला बचत गट आणि तृतीय क्रमांक समृद्धी स्वयंसहाय्यता महिला बचत गट अशा प्रकारे देण्यात आले.

यावेळी कुंभवडे सरपंच सौ. विजया कानडे,उपसरपंच श्री.सुशांत सावंत, कुंभवडे ग्रामसेवक श्री.प्रशांत वर्दम, कुंभवडे कृषिसेवक श्रीम.शीतल सावंत, दिगवळे कृषिसेवक श्रीम.साधना जाधव , महिला बचत गट सीआरपी सौ.सारिका सावंत, कृषिमित्र श्री. संतोष दळवी, ग्राप. सदस्य, ग्राप. कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचारी व कुंभवडे गावातील महिला उपस्थित होते. तसेच पाककला स्पर्धेतील सहभागी महिलांना कृषि विभागामार्फत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + twelve =