You are currently viewing मळेवाड येथील प्रथमेश नाईक याची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड

मळेवाड येथील प्रथमेश नाईक याची महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड

१९ वर्षाखालील संघामध्ये उपकर्णधार म्हणून निवड

सावंतवाडी

मळेवाड नाईकवाडी येथील प्रथमेश चंद्रकांत नाईक याची १९ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याच्या या निवडीने सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रथमेशने गेली तीन वर्ष लेदर बॉल क्रिकेट सामने खेळायला सुरुवात केली होती. अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र अंडर -१९ मध्ये त्याची निवड करण्यात आली.

अतिशय अथक परिश्रम घेऊन प्रथमेशने आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळेच आता त्याला २०२१ ला झेडसीएल् आणि एनसीएल क्रिकेट लीग मध्ये निवड झाल्यानंतर पुणे येथील मुंबई संघासाठी घेतलेल्या निवड चाचणीत मुंबई -१९ च्या संघामध्ये निवड करण्यात आली. तसेच २०२१ च्या एनसीएल क्रिकेट लीगमध्ये निवड झाली. याबाबत प्रथमेशम्हणाला की, आपण घेतलेली मेहनत, केलेला क्रिकेटचा सराव, आपल्याला मिळालेल योग्य मार्गदर्शन, चांगले मार्गदर्शक यामुळेच आपली महाराष्ट्र -१९ च्या संघाचा उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

आपण आपल्या पदाला योग्य न्याय देऊन संघाला साजेशी कामगिरी करून दाखवणार असल्याचे त्याने सांगितल. प्रथमेश नाईक हा मुळ सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड (नाईकवाडी) येथील असून सद्या शैक्षणिक व क्रिकेटचे शिक्षण मुंबईमध्ये घेत आहे. प्रथमेशची उपकर्णधार म्हणून निवड झाल्यामुळे सर्वांनी त्याला शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 2 =