You are currently viewing विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राष्ट्रवादीचे सहकार्य

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राष्ट्रवादीचे सहकार्य

प्रांतिक सदस्य एम के गावडे यांचे आश्वासन

वेंगुर्ला

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात यापुढेही अशीच उन्नती करावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पूर्णतः सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले.

वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॅम्प येथील महिला काथ्या संस्था येथे वेंगुर्ल्यातील ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना जायफळ कलमे देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, महिला काथ्या कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मकरंद परब, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सचिन शेटये, स्वप्निल रावळ, अष्टविनायक सावंत आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले पत्रकार दाजी नाईक आणि सदस्य म्हणून निवड झालेले पत्रकार दिपेश परब यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रज्ञा परब, नम्रता कुबल यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान साटेलकर यांनी व मकरंद परब यांनी आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा