कणकवली प्रांताधिकारी कार्यालय आज आणि उद्या पूर्ण दिवस बंद

कणकवली प्रांताधिकारी कार्यालय आज आणि उद्या पूर्ण दिवस बंद

कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खबरदारीचा उपाय

कणकवली

प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आज आणि उद्या २६ जानेवारीपर्यंत संपूर्ण प्रांताधिकारी कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. कणकवली प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याची कोव्हीड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. महसुलविषयक कामांसाठी कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील नागरिकांची मोठी वर्दळ कणकवली प्रांताधिकारी कार्यालयात असते. खबरदारीचा उपाय म्हणून २५ आणि २६ जानेवारी पर्यंत संपूर्ण कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे.याची नोंद घेत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा