You are currently viewing परुळे येथे व्याघ्रदिनाबद्ल विविध कार्यक्रमांचे आयोजन

परुळे येथे व्याघ्रदिनाबद्ल विविध कार्यक्रमांचे आयोजन

परुळे :

 

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ, माय वे जर्नी ऑर्गनिझेशन आणि परुळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वाघांबद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच वाघांचे संवर्धन करण्यासाठी “सड्यावरील शाळा” या उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे गावात जी. प. केंद्र शाळा परुळे येथे व्याघ्रदिनाबद्ल विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. परुळे शाळेतील जवळपास 50 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्याचप्रमाणे परुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, परुळे ग्रामस्थ आणि संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − seven =